महाराष्ट्र : इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे लसचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यापूर्वी राज्यात प्रवेश देताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पाहिला जात होता मात्र आता करोनाच्या दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच राज्यात प्रवेश दिला जाईलअशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आणखी एक हजार डॉक्टर्सची भरती करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत राज्यात सध्याचे निर्बंध यापुढेही कायम राहणार अशी माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.