Dharmendra 90th Birth Anniversary : धर्मेंद्र यांचा वाढदिवस आणि खान कुटुंबाच अनोखं कनेक्शन; सांगताना सलमान खानचे डोळे पाणावले

बॉलीवूडचा हि मॅन धर्मेंद्र यांनी गेल्या महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला असून आज त्यांची 90 वी जयंती आहे.
Dharmendra 90th Birth Anniversary : धर्मेंद्र यांचा वाढदिवस आणि खान कुटुंबाच अनोखं कनेक्शन; सांगताना सलमान खानचे डोळे पाणावले

बॉलीवूडचा हि मॅन धर्मेंद्र यांनी गेल्या महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला असून आज त्यांची 90 वी जयंती आहे. 8 डिसेंबर 1935 रोजी धर्मेंद्र यांचा जन्म झाला असून गेल्या 60 दशकांपासून यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गेल्या काही महिन्यांपासून यांची मृत्यूशी झुंज सुरू असतानाचा अखेर गेल्या महिन्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून याचा परिणाम नुकताच बिग बॉस सिजन १९ च्या अंतिम सोहळ्यातही पाहायला मिळाला. रविवार, 7 डिसेंबर रोजी बिग बॉस 19 चा अंतिम सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे होस्ट सलमान खान यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. बिग बॉसच्या बहुतांश सिजनला धर्मेंद्र यंनी हजेरी दर्शवली होती. शिवाय सलमानसोबतचे त्यांचे नातेही खास होती. अशावेळी सलमानने आपला पिता गमावल्याचे व्यक्त केले. या क्षणी सलमानचे डोले भरून आले होते.

हेही वाचा : Bigg Boss 19 Winner : फरहाना–प्रणीत नाही तर ‘या’ स्पर्धकाने पटकावलं ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद

सलमानचे सांगितलं खान कुटुंबासोबतचं नातं

सलमान खान हा धर्मेंद्र यांच्या खूपच जवळचा होता. धर्मेंद्रही त्याला मुलाप्रमाणे मानत असे. त्यामुळेच धर्मेंद्रच्या जाण्याने कुणीतरी आपल्या घरातील व्यक्ती गेल्याची भावना सलमानने व्यक्त केली. शिवाय धर्मेंद्रच्या मृत्यूच्या दिवशीच म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी आपले वडिल सलीम खान यांचा वाढदिवस होता, असे सलमानने शोमध्ये सांगितले. तर आज  8 डिसेंबर रोजी आपल्या आईचा वाढदिवस असल्याचेही त्याने नमूद केले. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींचा धर्मेंद्रच्या जन्म व मृत्यू तारखेशी असा योगायोग जुळणे विलक्षण असल्याचे त्याने यावेळी म्हटले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version