मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार

मुंबई महापालिकेवर ७ मार्चनंतर प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

७ मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे तसेच एप्रिल अखेर किंवा मे महिन्यामध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ७ मार्चनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारने मागील वर्षी मुंबईसह महापालिका अधिनियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार मुदत संपलेल्या पालिकेवर प्रशासक नियुक्त केला जाईल. तसेच यानुसार पालिकेतील नगरसेवकांना पाच वर्षांमध्ये मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version