विनोद भानुशाली यांच्या नेतृत्वाखालील भानुशाली स्टुडिओज लिमिटेड हॉलिवूडचे दूरदर्शी कथाकार आणि लोकप्रिय चित्रपट ट्रान्सफॉर्मर्सचे दिग्दर्शक मायकेल बे यांच्याशी सर्जनशीलपणे सहयोग करण्यास सज्ज आहे. दिग्दर्शक मायकेल बे यांनी आपल्या बॅड बॉईज, आर्मागेडन, पर्ल हार्बर, द ट्रान्सफॉर्मर्स फ्रँचायझी, अ क्वाइट प्लेस फ्रँचायझी आणि यांसारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
हा अॅड्रेनालाईन-चार्ज्ड प्रकल्प बॉस, ब्लू आणि अझहरसारख्या उच्च दर्जाच्या मनोरंजनासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते अँथनी डिसूझा दिग्दर्शित करतील. या टीममध्ये दुसरे तिसरे कोणी नसून भारतातील संगीताचे उस्ताद ए. आर. रहमान आहेत. ज्यांनी भारतीय कथा आणि संगीत जागतिक व्यासपीठावर नेले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.