Stampede Case: ‘पुष्पा 2’ चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत मोठी अपडेट; अल्लू अर्जुनसह 23 जणांविरुद्ध 100 पानांचे आरोपपत्र दाखल

या 100 पानांच्या सविस्तर आरोपपत्रात अल्लू अर्जुनसह एकूण 23 जणांना आरोपी म्हणून नामांकित करण्यात आले आहे.<br/>
Stampede Case: ‘पुष्पा 2’ चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत मोठी अपडेट; अल्लू अर्जुनसह 23 जणांविरुद्ध 100 पानांचे आरोपपत्र दाखल

Stampede Case: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिसांनी अधिकृत आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले आहे. या 100 पानांच्या सविस्तर आरोपपत्रात अल्लू अर्जुनसह एकूण 23 जणांना आरोपी म्हणून नामांकित करण्यात आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' चे प्रीमियर स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. या गर्दीचे रूपांतर भीषण चेंगराचेंगरीत झाले, ज्यामध्ये 35 वर्षीय रेवती नावाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा अल्पवयीन मुलगा श्रीतज गंभीर जखमी झाला. या मुलावर अद्यापही उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Battle of Galwan Teaser : सलमान खानच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त फॅन्सना खास गिफ्ट, 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक 11 (A-11) म्हणून स्थान दिले आहे. याशिवाय आरोपींच्या यादीत खालील व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे.  अभिनेत्याचे वैयक्तिक कर्मचारी, सुरक्षा पथकातील सदस्य आणि चित्रपट निर्मिती संस्थेचे प्रतिनिधी यांचाही आरोपींच्या यादीत समावेश आहे. हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी सांगितले की, 24 डिसेंबर रोजी स्थानिक न्यायालयात 23 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

पोलिसांचे गंभीर आरोप

हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात घोर निष्काळजीपणा आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाला. अत्यंत धोकादायक गर्दी असतानाही अल्लू अर्जुनने थिएटरला भेट दिली आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला नाही, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, थिएटर प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली नव्हती, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा – Drishyam 3: 'यश त्याच्या डोक्यात गेलयं…'; अक्षय खन्नाच्या दृश्यम 3 मधून बाहेर पडण्यावर निर्माते कुमार मंगत यांचा संताप

एका रात्रीचा तुरुंगवास आणि जामीन

या घटनेनंतर अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, ज्यामुळे त्याला एक रात्र तुरुंगात घालवावी लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जामीन मंजूर झाला होता. विशेष म्हणजे, या वादाच्या पार्श्वभूमीवर 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले. मात्र, आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्याने अल्लू अर्जुनच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version