Ajit Pawar Death: ‘महाराष्ट्राचा आधार हरपला…’; अजितदादांच्या निधनाने कलाविश्व हळहळले, संकर्षण कऱ्हाडे आणि वंदना गुप्तेंनी शेअर केल्या आठवणी

&quotप्रशासनातील शिस्त आणि कलेवर प्रेम करणारा एक हक्काचा माणूस गेला,&quot अशा शब्दांत कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.<br/>
Ajit Pawar Death: ‘महाराष्ट्राचा आधार हरपला…’; अजितदादांच्या निधनाने कलाविश्व हळहळले, संकर्षण कऱ्हाडे आणि वंदना गुप्तेंनी शेअर केल्या आठवणी

Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे. “प्रशासनातील शिस्त आणि कलेवर प्रेम करणारा एक हक्काचा माणूस गेला,” अशा शब्दांत कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“घरातला माणूस गेल्यासारखं वाटतंय” – संकर्षण कऱ्हाडे
लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत दादांना श्रद्धांजली वाहिली. संकर्षणने म्हटलं आहे की, “काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत यापेक्षा ती राजकारणात सक्रिय असली की एक आधार वाटतो. दादांच्या जाण्याने आज घरातलं कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय, खूप त्रास होतोय. गंभीर प्रश्नांना मिश्किल उत्तरे देऊन पत्रकार परिषद खेळती ठेवण्याची त्यांची शैली आता पुन्हा दिसणार नाही.” संकर्षणने पुढे म्हटले की, दादांच्या छायेत वावरणारे अनेक कार्यकर्ते आज खऱ्या अर्थाने पोरके झाले आहेत.

हेही वाचा – Ajit Pawar Last Call: “किरण, मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय…” अपघातापूर्वी दादांनी मित्राजवळ केलं होतं मन मोकळं

“वक्तशीरपणा आणि तत्पर निर्णयाचा माणूस” – वंदना गुप्ते
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही दोन महिन्यांपूर्वीच्या भेटीचा एक किस्सा शेअर करत दादांच्या कार्यपद्धतीला सलाम केला आहे. “माणिक वर्मा जन्मशताब्दी” कार्यक्रमासाठी निधीची विनंती घेऊन गेल्यावर दादांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘ताबडतोब फंड द्या’ असे आदेश दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. बारामतीतील नाट्यसंमेलनात त्यांनी केलेल्या पाहुणचाराचाही उल्लेख वंदना गुप्ते यांनी आदराने केला.

अपघाताचा तो काळजाचा ठोका चुकवणारा थरार
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 8:10 वाजता अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून बारामतीसाठी उड्डाण केले होते. मात्र, पावणेनऊच्या सुमारास लँडिंगपूर्वीच विमानाला भीषण अपघात झाला. आज गुरुवारी 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडत आहेत. एका कर्तव्यदक्ष नेत्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version