Asha Bhosle Funeral :स्वरसम्राज्ञीला अखेरचा निरोप; आज किती वाजता होणार अंत्यसंस्कार? कुठे घेता येईल अंतिम दर्शन

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीतसृष्टीत शोककळा पसरली असून आज मुंबईत त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन ठेवण्यात आले आहे
Asha Bhosle Funeral :स्वरसम्राज्ञीला अखेरचा निरोप; आज किती वाजता होणार अंत्यसंस्कार? कुठे घेता येईल अंतिम दर्शन

भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज आणि बहुआयामी गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. रविवारी, 12 एप्रिल रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (१३ एप्रिल) मुंबईत त्यांचे अंतिम संस्कार पार पडणार आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत लोअर परळ येथील कासा ग्रांडे टॉवर ए येथे त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन ठेवण्यात आले आहे. या दरम्यान चाहते आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनीही त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी वातावरण अत्यंत भावूक झाले होते.दरम्यान, आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंत्यसंस्कारावेळी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणावर लोक येण्याची शक्यता असल्याने शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आज संध्याकाळी 4 वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या सुरेल आवाजाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version