आरक्षणाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांची नितीन गडकरींवर टीका

आरक्षणाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांची नितीन गडकरींवर टीका

आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. ‘केवळ आरक्षणामुळे एखाद्या समाजाची प्रगती होते, यामध्ये तथ्य नाही’ असं विधान गडकरींनी केलं होतं. या विधानावर आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच गडकरीं यांच्यावर टीका देखील त्यांनी केली.

काय म्हणाले आव्हाड?

नितीन गडकरी सारखे आरक्षणाबद्दल का बोलतायेत, नेमकं त्या मागे काय कारण आहे हे माहीत नाही.

देशात आरक्षण नसावे हा RSS चा अजेंडा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नामदेव ढसाळ यांच्या सारख्यांवर बापदादांची पुण्याई नव्हती.

कारण जेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा आमचे बाप दादा गुरंढोरं राखत होते, मैला उचलत होते.

मागासवर्गीय समाजाला अक्षर ओळख व्हायला 5 हजार वर्षे लागली.

गेली कित्येक वर्षे देशांतील 80 टक्के मागासवर्गीय समाज गाव कुसा बाहेर ठेवला गेला होता. याचा विचार कधीतरी करा, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींच्या आरक्षणाच्या मुद्दयावर सडकून टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version