आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण : आणखी एक आरोपी अटकेत

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण : आणखी एक आरोपी अटकेत

आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी आणखी एका आरोपील पोलिसांनी अटक केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी अंकुशनगरयेथून अतुल प्रभाकर राख या आरोपीला अटक कले आहे. पेपरफुटी प्रकरणी अतुल राख यास अटक केल्यामुळे इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

आरोग्य भरती पेपरफुटीप्रकरणी मुख्य आरोपी जीवन सानप यांच्या सर्व हालचालींना अतुर राख सहकार्य करायचा. अतुल राख हा संजय सानप यांचा मेहुणा आहे.

आरोग्य विभागाचे गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. याप्रकरणी आता पुणे सायबर पोलिसांची कारवाई करत अतुल राख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version