घरकुल घोटाळ्यात सर्व आरोपी दोषी, सुरेश जैन यांना 7 वर्षाची तर देवकरांना 5 वर्षांची शिक्षा

घरकुल घोटाळ्यात सर्व आरोपी दोषी, सुरेश जैन यांना 7 वर्षाची तर देवकरांना 5 वर्षांची शिक्षा

अनेक वर्षापासून चालू असलेल्या खटल्याचा आज निकाल लागला आहे. जळगाव मधील घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री, शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांना आरोपी ठरवण्यात आले आहे. तसेच या घोटाळ्यातील अन्य व्यक्तींना आरोपी घोषित केले. यात एकूण 52 आरोपी आहेत. त्यापैकी तीन आरोपी मृत झालेले आहेत. आणि एक आरोपी फरार आहे. या निकालात न्यायालयाने जैन, देवकर यांच्यासह अन्य 48 जणांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे जळगाव घरकुल घोटाळा ?

झोपडपट्टी निर्मुलनासाठी जळगावात घरकुल योजना आणण्यात आली.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील सत्ताधा-यांची ही योजना होती.

जळगावातील हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरासाठी ही योजना आणण्यात आली आहे.

घरकुल योजनेसाठी 110 कोटींचं कर्ज काढण्यात आलं. कर्ज काढून 11 हजार घरं बांधण्यात आली.

घरांच्या बांधकामास 1999 साली सुरवात झाली.  2011 साली योजनेतील घोळ उघड झाला.

योजनेतील 29 कोटी 59 लाखांच्या गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

घरकुल बांधण्यात आलेली जागा पालिकेच्या मालकीची नव्हती.  योजनेसाठी बिगरशेती परवानगी घेण्यात आली नाही. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या बिल्डर्सना काम दिले

ठेकेदारांना 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले.  ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून देण्यात आली

31 ऑगस्ट 2019 घरकुल घोटाळ्यातील सर्व 48 आरोपी दोषी होते. माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

गुलाबाराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  सर्व आरोपींना 5 ते 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version