राजापूरला पुराचा वेढा

राजापूरला पुराचा वेढा

सोमवारपासून राजापूर तालुक्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. असून राजापूर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. राजापूर शहरा जवळ असलेल्या कोदवली नदी तसेच अर्जुना नदी यांना देखील पूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसून येत आहे सतत पडत असलेल्या पावसामुळे राजापूर नगरपरिषद तसेच तहसीलदार प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे .आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे नागरिकांना सुचित करण्यात येत आहे.

हवामान खात्याने रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन सतर्क झाले आहे.पुरामुळे नागरिकांची भीती वाढली आहे. तर लोकांना घरा बाहेर पडण्यासाठी देखील अडचणी निर्माण होत आहेत. तर राजापूरच्या बाजारपेठेत सुद्धा पुराचे पाणी घुसण्याची शक्यता आहे.

Rajapur | राजापूरला पुराचा वेढा | Marathi News

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version