औरंगाबादमध्ये उद्योगपत्यांच्या कार्यालयात ईडीची धाड

औरंगाबादमध्ये उद्योगपत्यांच्या कार्यालयात ईडीची धाड

   क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्यात अनके आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे औरंगाबादमधील उद्योजग, व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने व्यावसायिकांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी धाड टाकली आहे. वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भांत ईडीच्या धाडी पडल्याची माहिती समोर आली आहे.

  औरंगाबाद शहरातील ज्या व्यावसायिकांवर ईडीने धाड टाकली आहे, त्यातील एक बांधकाम व्यवसायिक आहे तर, दुसरा सीड्स कंपनी संबंधित व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अद्याप ईडीतर्फे कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता औरंगाबाद शहराती बडे उद्योजक आणि व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. तसेच पुण्यातही ईडीच्या धाडी पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version