बेलारुसमध्ये रशिया-युक्रेन शिष्टमंडळाची चर्चा

बेलारुसमध्ये रशिया-युक्रेन शिष्टमंडळाची चर्चा

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम असून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या युद्धादरम्यान, रशिया-युक्रेन यांच्या शिष्टमंडळाची बेलारूसमध्ये चर्चा झाली आहे. रशिया-युक्रेनचे शिष्टमंडळ बेलारूसला पोहचले असून, त्यांच्या चर्चेला सुरूवात झाली असल्याची माहिती बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

बेलारूसने याआधी म्हटले होते की, ते रशियाला हवाई हल्ल्यासाठी आपल्या भूभागाचा वापर करू देणार नाही. मात्र, आज युक्रेनच्या विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्राचा हल्ला बेलारूसच्या धर्तीवरून करण्यात आला. या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये तणावग्रस्त परिस्थिती उद्भवल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना जिथे आहेत तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version