Kantara Controversy: ‘धुरंधर 2’ हिट, पण कायदेशीर कचाट्यात अडकला रणवीर सिंग; ‘कांतारा’ प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात मागणार बिनशर्त माफी

कांतारा चित्रपटातील 'दैव' पात्राची नक्कल केल्याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरवर (FIR) कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
Kantara Controversy: ‘धुरंधर 2’ हिट, पण कायदेशीर कचाट्यात अडकला रणवीर सिंग; ‘कांतारा’ प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात मागणार बिनशर्त माफी

Kantara Controversy: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील घवघवीत यशामुळे चर्चेत असतानाच, जुन्या 'कांतारा' वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. कांतारा चित्रपटातील 'दैव' पात्राची नक्कल केल्याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरवर (FIR) कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी रणवीर सिंगच्या वकिलांनी स्पष्ट केले की, अभिनेता या प्रकरणाबद्दल पश्चात्ताप व्यक्त करत असून न्यायालयात अधिकृत प्रतिज्ञापत्र सादर करून बिनशर्त माफी मागण्यास तयार आहे.

सोशल मीडियावरील माफीनाम्यावर सरकारी पक्षाचा आक्षेप
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने रणवीरने यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माफीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा माफीनामा अभिनेत्याने स्वतः न लिहिता त्याच्या सोशल मीडिया टीमने पोस्ट केला असावा, असा युक्तिवाद प्रोसिक्युशनने केला. यावर उत्तर देताना रणवीरच्या वकिलांनी सांगितले की, अभिनेत्याला आपल्या कृतीचा मनापासून खेद वाटत आहे. इतकेच नव्हे तर, रणवीर म्हैसूर येथील प्रसिद्ध चामुंडी मंदिराला स्वतः भेट देऊन प्रत्यक्षपणे क्षमायाचना करेल, असा प्रस्तावही वकिलांनी न्यायालयासमोर ठेवला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार असून, त्यावेळी रणवीरला आपले लेखी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

नेमका 'कांतारा' वाद काय आहे?
हा वाद 2025 मध्ये गोव्यातील 'इन्टरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' (IFFI) दरम्यान सुरू झाला होता. या कार्यक्रमात रणवीर सिंगने ऋषभ शेट्टीच्या कांतारा: चॅप्टर १ मधील अभिनयाचे कौतुक करताना 'चामुंडी दैव'च्या अंगात येण्याच्या दृश्याची नक्कल केली होती. ही नक्कल करताना त्याने दैवाचा उल्लेख "स्त्री भूत" असा केला, ज्यामुळे दक्षिण भारतातील नागरिकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावल्या गेल्या. या कृतीनंतर रणवीरवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा –Badshah Weds Isha Rikhi : बादशाहने उरकले दुसरे लग्न? पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबतचे फोटो व्हायरल 

सांस्कृतिक संवेदनशीलतेचा आदर  
वादानंतर रणवीरने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून स्पष्ट केले होते की, कोणाचाही अपमान करण्याचा त्याचा हेतू नव्हता, तर तो केवळ ऋषभ शेट्टीच्या कलेचे कौतुक करत होता. विशेष म्हणजे, एकीकडे हा कायदेशीर लढा सुरू असताना दुसरीकडे रणवीरचा 'धुरंधर 2' हा स्पाय-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. स्वतः ऋषभ शेट्टीनेही नुकतीच एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाचे आणि रणवीरच्या कामाचे कौतुक केले आहे, ज्यामुळे दोन्ही कलाकारांमधील व्यावसायिक आदर कायम असल्याचे दिसून येते.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version