तिवसा नगरपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व कायम

तिवसा नगरपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व कायम

अमरावतीमधील तिवसा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला असून काँग्रेसने १२ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

तिवसामध्ये १७ जागांवर नगरपंचायत निवडणूक पार पडली. तर नगरपंचायत निवडणूकीचा निकाल हाती लागला असून काँग्रेसने १२ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. तर शिवसेना ४ जागांवर विजयी झाली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला १ जागा मिळाली असून भाजपला एकही जागा मिळालेली नाही. दरम्यान काँग्रेसने बहुमत मिळवून नगरपंचायत निवडणूकीमध्ये वर्चस्व मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version