किराणा दुकानात वाईन विक्रीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. तर दुसरीके कोल्हापुरमध्ये मद्यपेयच्या बाटलीत च्युइंगम आढळला आहे. सीलबंद मद्यपेयच्या बाटलीत च्युइंगम आढळल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे सामाजिक अंतर पाळण्याचे तसेच मास्क वापरण्याचे बंधन प्रशासनाने घातले आहे. अशातच कोरोना काळात कोल्हापूरमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता अशोक चंदवाणी यांनी केली आहे. तसेच यानुसार या बाटलीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितले आहे.
#BIGNEWS Sealed Liquor
सीलबंद दारूच्या बाटलीत आढळले च्युइंगम
उत्पादन शुल्क विभागाने घेतली गंभीर दखल
#JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Sealed #liquor #Chewinggum #sealedliquorbottle #ExciseDepartment — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) January 29, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.