कोवॅक्सिन लस खरेदीवरुन ब्राझीलचं राजकारण तापलं…

कोवॅक्सिन लस खरेदीवरुन ब्राझीलचं राजकारण तापलं…

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या खरेदीवरुन ब्राझीलचं राजकारण चांगलंच तापलंय. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकसोबत झालेला दोन कोटी लस खरेदीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या कराराची चौकशी ९० दिवसांच्या आत करावी आणि आपल्याला अहवाल सादर करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती जेर बोलसोनारो यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये ब्राझील सरकारने हैदराबाद मधील लस निर्मिती कंपनी असलेल्या भारत बायोटेकशी दोन कोटी लसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या कराराची एकूण रक्कम ही २४०० कोटी रुपये होती. या करारामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी ब्राझीलच्या राष्ट्रपतींवर केला होता. त्यानंतर हा करार रद्द करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version