वर्ध्यातील आर्वीयेथील कदम रुग्णालयातील बेकायदेशीररीत्या केलेल्या गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. वर्ध्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपातप्रकरणी पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या साहाय्याने शोधकार्य सुरू केले. या शोधकार्यादरम्यान एका लहान कवटी सापडली आहे.
बुधवारी पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गॅस चेंबरची तपासणी केली असता त्यांना ११ कवट्या आणि ५४ हाडे मिळून आली होती. त्यामुळे पोलिसांच्या चमुने वर्धा आणि नागपूरच्या फॉरेन्सिक चमुंच्या मदतीने या परिसराचा पुन्हा तापस करण्यात आला. या तपासात त्यांना एक लहान कवटी आणि काही बायो मेडिकल वेस्ट मटेरियल सापडले.
अल्पवयीन मुलीचा गर्भपातप्रकरणी कदम रुग्णालयाच्या महिला डॉ. रेखा कदम यांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर डॉ. रेखा कदम यांना सहकार्य केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या दोन्ही परिचारिका यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.