Amitabh Bachhan: अयोध्येत ‘शहेनशहां’चा नवा सातबारा; राम नगरीत अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या जमिनीची किंमत जाणून तुम्हीही थक्क व्हाल

जाणकारांच्या मते, आगामी काळात अयोध्या केवळ धार्मिक पर्यटनाचे केंद्र राहणार नाही, तर रिअल इस्टेट आणि आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे शहर म्हणून उदयास येऊ शकते.
Amitabh Bachhan: अयोध्येत ‘शहेनशहां’चा नवा सातबारा; राम नगरीत अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या जमिनीची किंमत जाणून तुम्हीही थक्क व्हाल

उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत राम मंदिर उभारल्यानंतर देश-विदेशातील भाविकांसोबतच मोठ्या उद्योगपती आणि सेलिब्रिटींचेही लक्ष या शहराकडे वेधले गेले आहे. धार्मिक महत्त्वासोबतच वाढत असलेला पर्यटन विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या वाढत्या संधींमुळे अयोध्या रिअल इस्टेटच्या नकाशावर वेगाने पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘बिग बी’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत आणखी एक भूखंड खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढा’ या रिअल इस्टेट प्रकल्पातून सुमारे 10,617 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाची जमीन खरेदी केली आहे. या व्यवहाराची किंमत सुमारे 25 कोटी 20 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत अयोध्येत बिग बी यांनी खरेदी केलेली ही चौथी जमीन असल्याने या गुंतवणुकीची मोठी चर्चा रंगली आहे.

ही जमीन सरयू नदीच्या तटाजवळ विकसित होत असलेल्या लक्झरी लँड प्रोजेक्टच्या परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यात या भागात उच्चस्तरीय निवासी आणि पर्यटन प्रकल्प उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या परिसरातील जमिनीचे महत्त्व आणि मूल्य दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Eknath Shinde: उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील 'शक्तिपीठ' कोसळले; माजी खासदार आणि दिग्गज नेत्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

या व्यवहाराची प्रक्रिया एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश ऋषिकेश यादव यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पावर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून हा जमीन व्यवहार पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

राम मंदिराच्या बांधकामानंतर अयोध्येत पर्यटनाची मोठी लाट आली असून शहरात रस्ते, विमानतळ, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास सुरू आहे. त्यामुळे मोठे गुंतवणूकदार आणि सेलिब्रिटी अयोध्येकडे संभाव्य गुंतवणूक केंद्र म्हणून पाहत आहेत. अमिताभ बच्चन यांची ही गुंतवणूक देखील त्याच प्रवाहाचा भाग मानली जात आहे.

जाणकारांच्या मते, आगामी काळात अयोध्या केवळ धार्मिक पर्यटनाचे केंद्र राहणार नाही, तर रिअल इस्टेट आणि आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे शहर म्हणून उदयास येऊ शकते. त्यामुळे भविष्यात या शहरातील जमीन आणि मालमत्तेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Aditya Thackeray: मविआमध्ये मिठाचा खडा? राज्यसभेवरून आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली मनातील 'सल'; शरद पवार यांच्या उमेदवारीवर मोठं विधान

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version