हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपीला जन्मठेप

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपीला जन्मठेप

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिंगणघाट सत्र न्यायालयाने आज आरोपी विकेश नगराळेला जन्मठपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आज हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडीत शिक्षिकेच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आज हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती. मात्र, हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.बी. भागवत यांनी आरोपीला ५ हजार रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे पीडीत महिलेला न्याय मिळाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. तसेच न्यायालयाच्या निकालाने समाधानी असल्याचे पीडीतेच्या आई-वडिलांनी व्यक्त केले आहे.

काय आहे प्रकरण?

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित प्राध्यापक आशाताई कुणावार या महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाच्या अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. ३ फेब्रुवारी २०२० रोजी त्या हिंगणघाट येथे पोहचल्या. महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे त्यांची वाट पाहत होता. यावेळी पीडित प्राध्यापक दिसताक्षणी आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. घटनेनंतर पीडितेला लगेचच नागपूर ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आठवडाभर मृत्यूशी झुंज देत अखेर १० फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version