उदित नारायण व अलका याग्निकचा नात्याला बायकोने दिली परवानगी

उदित नारायण व अलका याग्निकचा नात्याला बायकोने दिली परवानगी

मुंबई, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलीवूडच्या सुपर-डुपर जोडींचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा त्यात सहसा अभिनेते-अभिनेत्री यांच्या जोड्यांची चर्चा केली जाते. काही लोकांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लोकांच्या थेट हृदयाला हात घालते, तर काहींची जोडी आपल्या रियल लाईफ पार्टनर सोबत ट्यूनिंगची प्रेरणा देते. तर अशा या जोड्यांच्या यादीत गायकांचा क्वचितच समावेश होतो. पण सत्य हे आहे की चित्रपटसृष्टीत अशा अनेक गायक जोड्या आहेत, जी आपल्या क्युट बॉन्डींगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक ही अशीच एक जोडी! या दोघांनी मिळून अनेक सुपरहिट गाणी इंडस्ट्रीला दिली आहेत. एक काळ असा होता की उदित जर ड्यूएट गाणार असतील तर त्यांच्यासोबत अलका यांचा आवाज नक्कीच ऐकायला मिळणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र, यामुळे त्यांच्यात काहीतरी सुरु आहे अशाही अनेक अफवा इंडस्ट्री मध्ये पसरल्या. उदित नारायण यांची पत्नी दीपा याविषयी काय विचार करते हे एका शोदरम्यान सर्वांसमोर आले होते.

उदित नारायण यांच्या पत्नी दिपा काय म्हणाल्या होत्या ?

ही संपूर्ण स्टोरी त्यावेळची आहे जेव्हा उदित नारायण आणि त्यांची पत्नी एका गायन स्पर्धेच्या शो साठी उपस्थित होते. त्यात अलका याज्ञिकही उपस्थित होत्या. यादरम्यान दीपाने त्यांची पहिली भेट आणि उदितच्या प्रेमात पडल्याचा किस्सा शेअर केला. दरम्यान, पती आणि अलका यांच्यातील मैत्रीचा उल्लेख होताच दिपा मनापासून हसल्या आणि म्हणाल्या, “मला त्यांचे नाते मान्य आहे.”

फार कमी पत्नी असं कबूल करू शकतात

सत्य हे आहे की ज्या आत्मविश्वासाने आणि आनंदाने दीपाने तिचा नवरा आणि मैत्रीण यांच्यातील मैत्रीचा स्वीकार केला, त्या आत्मविश्वासाने फार कमी बायका स्वीकार करू शकतात. साधारणपणे पती कोणत्याही स्त्रीच्या जवळ असण्याने पत्नीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मग ती सहकारी असो, बालपणीची मैत्रीण असो किंवा कामाच्या ठिकाणची सहकारी असो. ही असुरक्षिततेची भावना नात्यात विषासारखी विरघळते आणि वैवाहिक जीवनात भांडणे सुरु होतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version