स्वप्नील रंगला स्वामींच्या भक्तीरंगात !

स्वप्नील रंगला स्वामींच्या भक्तीरंगात !

नुकताच स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन पार पडला. अभिनेता – निर्माता स्वप्नील जोशी हा स्वामी भक्त आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर स्वामी समर्थ यांचा एक मन प्रसन्न करणारा व्हिडिओ पोस्ट केला. यातून स्वप्नील स्वामींचा निस्सीम भक्त आहे हे दिसून येतं.

सध्या स्वप्नील त्याचा निर्मिती असलेला ” नाच गं घुमा ” चित्रपट प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. बॅक टू बॅक कामाची रांग असताना स्वप्नील कामाच्या सोबतीने वैयक्तिक आयुष्य देखील तितक्याच चोखरित्या त्यांचा समतोल साधून काम करतोय. ही तारेवरची कसरत करत स्वप्नील 2024 वर्षात नवनवीन प्रोजेक्ट्स करण्यासाठी जोरदार तयारी करतोय.

स्वप्नील या बद्दल बोलताना म्हणतो ” स्वामींच माझ्या आयुष्यात खूप जवळच स्थान आहे. स्वामी म्हणतात ना ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असच कायम ते आपल्या सगळ्यांचं पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. स्वामींचं स्मरण हे खूप सकारात्मक ऊर्जा देऊन जातं आणि म्हणून किती ही कामात असलो कितीही अडचणी आल्या तरी स्वामी कायम सोबत आहेत. ही भावना मनात असते. कामाच्या व्यापातून वेळ काढून स्वामीच बोलावणं आलं की अक्कलकोटची वाट दिसते स्वामींच सुंदर दर्शन होतं आणि यातून अजून जास्त काम करण्याची प्रेरणा मिळते”

स्वप्नीलची भक्ती ही सगळ्यांनी पाहिली आहे. काम आणि घर दोन्ही गोष्टीची योग्य सांगड घालून स्वप्नील सगळचं उत्तमपणे निभावून घेतोय. २००२४ वर्ष हे त्याच्या साठी खूप जास्त खास आहे कारण तो अभिनयाच्या सोबतीने निर्माता सुद्धा झाला आहे आणि आगामी काळात तो अनेक मनोरंजन प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version