डेटिंगच्या चर्चांदरम्यान लग्नाविषयी काय म्हणाला विजय ?

डेटिंगच्या चर्चांदरम्यान लग्नाविषयी काय म्हणाला विजय ?

साऊथ सिनेसृष्टीचा प्रसिद्ध सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे एकमेकांना डेट करत असल्याची खळबळ गेल्या काही वर्षांपासून आहे..आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयने लग्नाविषयी त्याचे विचार स्पष्ट केले .त्यावरून पुन्हा एकदा त्याच जोशात दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.मात्र या दोघांनी वारंवार या चर्चांसमोर पाठ फिरवली आहे .आता पुन्हा एकदा रश्मिका आणि विजयच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. यामागचं कारण म्हणजे आगामी ‘फमिली स्टार’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजयने लग्नाविषयी त्याचे विचार व्यक्त केले. मला लग्न करायचं आहे आणि वडील बनायचं आहे, असं तो म्हणाला.

तमिळनाडूमधील कार्यक्रमात विजयला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. इतक्यात लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारल्यावर विजय म्हणाला, “मलाही लग्न करायची इच्छा आहे आणि मला पिता व्हायचं आहे.” यावेळी विजयने प्रेम विवाह करणार असल्याचंही सांगितलं आहे. मात्र माझ्या साथीदाराला आईवडिलांनी स्वीकारलं तरंचप्रेम विवाह ]करणार असल्याचं तो म्हणाला. विजय आणि रश्मिका यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. या दोघांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडते. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याचा खुलासा अद्याप केलेला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version