पूनम पांडेचे निधन, पण…

पूनम पांडेचे निधन, पण…

मुंबई, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झालेल्या पूनम पांडेचे निधन झाल्याचे वृत्त आले आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर तिच्या पीआर टीमने एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पण हे वृत्त आल्यापासून पूनमचे चाहते गोंधळात पडले आहेत.

पूनम पांडे ३२ वर्षांची होती. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer) झाल्यामुळे पूनमचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. पूनमचे निधन झाले त्यावेळी तिच्या नावावर सुमारे ५० कोटी रुपयांची संपत्ती होती, असेही वृत्त आहे. पूनमने २०२० मध्ये बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे याच्यासोबत लग्न केले. पण अवघ्या बारा दिवसांत हे लग्न मोडले. अनेकांसाठी हा धक्का होता. यानंतर पूनमच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. विशेष म्हणजे पूनमचे निधन नेमके कोणत्या दिवशी झाले यावरून चर्चेला उधाण आले आहे.

एरवी कोणत्याही सेलिब्रेटीच्या निधनानंतर त्या सेलिब्रेटीच्या अंत्यसंस्काराच्या बातम्या येतात. सोशल मीडियावर अर्थात समाज माध्यमांत सेलिब्रेटीच्या अंत्यसंस्काराचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतात. पण पूनमच्या बाबतीत असे काहीच घडलेले नाही. यामुळे पूनमच्या निधनाचे वृत्त आल्यापासून चर्चेला उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version