मायावतींचा उत्तराधिकारी जाहीर

मायावतींचा उत्तराधिकारी जाहीर

लखनूऊ, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांचा राजकीय उत्तराधिकारी रविवार १० डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला. पक्षाच्या लखनऊ येथे झालेल्या बैठकीत मायावती यांनी ही माहिती दिली. बैठकीत मायावतींनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. आकाश आनंद यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन केले आहे. त्यांनी २०१७ मध्ये राजकारणात पदार्पण केले. तेव्हा ते सहारनपूरच्या सभेत पहिल्यांदा मायावतींसोबत मंचावर दिसले. आकाश सध्या पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version