अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप

अफगाणिस्तान, १५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा जमीन हादरली आहे. हेरात शहरात मध्यरात्री भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री ३.३६ वाजता वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हेरातपासून ३३ किलोमीटर २० मैल अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रविवारी पश्चिम अफगाणिस्तानात ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपाचं सत्र सुरुच असून यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमधील भूकंपाचं सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भूकंपामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर वित्त हानी देखील झाली आहे.

भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि ऑफीसमधून बाहेर आले. प्रत्यक्षात गेल्या आठवडाभरात भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तानातील लोकांना एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामध्ये आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील भूकंप हा सीरिया आणि तुर्कस्तानमधील भूकंपापेक्षा भयंकर असल्याचे मानले जाते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version