दुसऱ्यांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी मलिक त्यांच्या बेडरुममद्ये का जातात?

दुसऱ्यांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी मलिक त्यांच्या बेडरुममद्ये का जातात?

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या महागड्या वस्तूंवरही मलिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मलिकांवर टीका केली आहे.

  नारायण राणे म्हणाले, नवाब मलिक लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या बेडरुमध्ये का जातात? ही चांगली सवय नाही. असा टोला नारायण राणेंनी नवाब मलिकांवर लगावला आहे. तसेच कोण काय वापरते, यावर मलिकांना काय करायचे आहे. तुमचे काही बाहेर काढले तर अवघड होईल, असा इशाराही राणेंनी मलिकांना दिला आहे.

राणेंच्या टीकेला मलिकांचे प्रत्युत्तर

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम  आहे. ते पडण्याचा प्रश्नच नाही. कारण, घाबरून पक्ष सोडणारे नारायण राणेसारखे भित्रे मंत्री या सरकारमध्ये नाही आहेत. असा खोचक टोला नवाब मलिकांनी नारायण राणेंवर लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version