Jalgaon: ‘माझ्याकडे पाहून का थुंकला’, जळगावात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू, 11 जण जखमी

जळगावच्या बिलवाडी गावात आज जुन्या वादातून निर्माण झालेल्या हिंसाचारात एकनाथ निंबा गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला.
Jalgaon: ‘माझ्याकडे पाहून का थुंकला’, जळगावात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू, 11 जण जखमी

जळगाव: जळगावच्या बिलवाडी गावात आज जुन्या वादातून निर्माण झालेल्या हिंसाचारात एकनाथ निंबा गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही कुटुंबांतील एकूण 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील व्यक्तीच्या दुचाकीला पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवून बाचाबाची केली होती. त्यानंतर आज रविवारी गावातील ग्रामपंचायत बांधकामस्थळी पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले आणि "माझ्याकडे पाहून का थुंकला?" या कारणावरून वाद चिघळला. लाकडी दांडे, पावड्या व अन्य साहित्य वापरून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा: Navi Mumbai Youth Viral Video : नवी मुंबईत हुल्लडबाज तरुणांचे जीवघेणे स्टंट

जखमींमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत रुग्णालयात संताप व्यक्त केला. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांनी भूमिका त्यांनी घेतली आहे. रुग्णालयात करु नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version