‘त्यांची कुत्रीही सुखरूप आणली’ – केंद्रीय मंत्री विजयकुमार सिंह

‘त्यांची कुत्रीही सुखरूप आणली’ – केंद्रीय मंत्री विजयकुमार सिंह

रशिया-युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस आहे. आजही रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम असून तीव्र लढाई सुरू आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या भारतीय रहिवाश्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत त्यांना पुन्हा सुखरुप मायदेशी आणण्यास केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशातच केंद्रीय मंत्री विजयकुमार सिंह यांनी ट्विट केले की, सी-१७ ग्लोबमास्टर विमान भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशी परतण्यासाठी सज्ज असून काही प्रवाश्यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांनाही सोबत आणले असल्याचे त्यांनी सांगितले.

रशिया-युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरुच आहेत. हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून युक्रेनहून अनेक नागरिक स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये अनेक भारतीय नागरिकही अडकले आहेत. त्यामुळे ‘ऑपरेशन गंगा’च्या अंतर्गत युक्रेनमधून भारतीय नागरिक मायदेशी परतत आहे. तसेच केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसोबत त्यांची कुत्रीसुद्धा सुखरुप आणली आहेत.

२०० भारतीयांना घेऊन सी-१७ ग्लोबमास्टर परतले

हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर हे विमान २०० भारतीयांसह रात्री उशीरा रोमानियाहून दिल्लीला परतले. गुरुवारपर्यंत ४ ग्लोबमास्टर विमाने ८०० भारतीय विद्यार्थ्यांसह देशात परतणार आहेत. पोलंड आणि हंगेरीहून गुरुवारी पहाटे दोन विमाने परततील. १० विमानांतून २,३०५ भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version