सोनिया गांधींनी ईडीकडे मागितली वेळ

सोनिया गांधींनी ईडीकडे मागितली वेळ

काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी गांधी माता-पुत्रला ईडीने नोटीस बजावली असून ८ जून रोजी चौकशीसाठी ईडीने हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी ईडीकडे वेळ मागितला आहे.

राहुल गांधी हे परदेशी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ईडीकडून समन्स बजावल्यानंतर राहुल गांधी यांनी ईडीला पत्र लिहित चौकशीसाठी पुढची वेळ मागितली होती. त्यामुळे ईडीने त्यांना समन्स पाठवून १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर, ८ जून रोजी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी ईडीकडे चौकशीसाठी वेळ मागितला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

  • नॅशनल हेराल्ड’ वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केलं होतं.
  • हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं.
  • काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं.
  • २०१२मध्ये ‘यंग इंडिया’ कंपनीनं वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं.
  • सोनिया आणि राहुल गांधी ‘यंग इंडिया’ कंपनीचे संचालक.
  • हक्क घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप.
  • भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप.
  • नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा.
  • राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं.
  • पटियाला हाऊस न्यायालयानं ठरवलं दोषी.
  • यंग इंडियाने फक्त ५० लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version