‘देशाने एक पराक्रमी पूत्र गमावला’ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

‘देशाने एक पराक्रमी पूत्र गमावला’ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

भारताचे सरंक्षणदलाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचे तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे. देशाने एक पराक्रमी पूत्र गमावला, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

‘अत्यंत दुर्देवी हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यांची पत्नी आणि ११ सशस्त्र दलाच्या जवानांच्या आकस्मिक निधनामुळे खूप दु:ख झाले. त्यांचे अकाली निधन हे आपल्या सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून येणारे नुकसान आहे.’, असे म्हणत राष्ट्रपतींनी सीडीएस रावत यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे.

काँग्रस नेते राहुल गांधी यांनीही सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘मी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबीयांसाठी शोक व्यक्त करतो. ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे. प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही मनापासून शोक व्यक्त करतो तसेच या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे’ असे म्हणत राहुल गांधींनी दु:ख व्यक्त केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version