‘तांबे पिता-पुत्रांची फसवेगिरी’

‘तांबे पिता-पुत्रांची फसवेगिरी’

सुधीर तांबे यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. गुरुवारी झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेईल. मात्र, काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच, मुलाला अपक्ष फॉर्म भरून भाजपाचा पाठिंबा घेणार म्हटलं आहे. हा एकप्रकारे विश्वासघात आहे. हायकमांडला आम्ही सगळे कळवले आहे. त्यानंतर कुणाला पाठिंबा द्यायचा हे स्पष्ट करू. काँग्रेस बंडखोराला पाठिंबा देणार नाही. सगळं ठरलेला कार्यक्रम होता. भाजपाने त्याठिकाणी फॉर्म भरला नाही. त्यामुळे पदवीधर मतदार अडाणी नाहीत. त्यांना सगळं कळतेय. भाजपा भय दाखवून घरं तोडण्याची कामे करतंय. भाजपाला त्याचा आनंद होतोय. ज्यादिवशी भाजपाचं घर फुटेल तेव्हा इतरांची घरे फुटण्याचं दु:ख कळेल असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.

दरम्यान सत्यजीत तांबे यांनी आपण अजुनही काँग्रेसमध्येच असल्याचं म्हटलं होतं. शिवाय आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असून सर्वांच्या भेटी घेणार असल्याचं नमूद केलं होतं. तसेच भाजपच्या नेत्यांना देखील विनंती करणार असल्याचं नमूद केलं होतं. तेव्हापासून सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version