Strait of Hormuz LPG Tankers : इराणने मैत्री जपली! ‘त्या’ एका करारानंतर भारतात दोन एलपीजी गॅसचे टॅंकर येणार,जाणून घ्या सविस्तरपणे

भारत आणि इराणच्या सर्वोच्च नेतृत्वातील चर्चेनंतर, होर्मुझची सामुद्रधुनी भारतीय जहाजांसाठी खुली झाल्याचा दावा केला जात आहे.
Strait of Hormuz LPG Tankers : इराणने मैत्री जपली! ‘त्या’ एका करारानंतर भारतात दोन एलपीजी गॅसचे टॅंकर येणार,जाणून घ्या सविस्तरपणे

पश्चिम आशियातील तणावामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा कॉरिडॉरमधून पुरवठा विस्कळीत झाला असताना, इराणने दोन भारतीय द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) टँकरना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. अलिकडच्या काळात भारतातील अनेक शहरांमध्ये घरगुती गॅससाठी संघर्ष सुरू आहे. भारत आणि इराणच्या सर्वोच्च नेतृत्वातील चर्चेनंतर, होर्मुझची सामुद्रधुनी भारतीय जहाजांसाठी खुली झाल्याचा दावा केला जात आहे.

रॉयटर्सने सूत्रानुसार,  भारत आणि इराणमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीबाबत करार झाला आहे. इराणच्या मंजुरीनंतर, शुक्रवारी दोन जहाजे सामुद्रधुनीतून निघतील आणि येत्या काही दिवसांत भारतात पोहोचतील. ही जहाजे हजारो मेट्रिक टन एलपीजी वाहून नेत आहेत.

हेही वाचा – Salman Agha Run Out: क्रिकेट मैदानावर घडला अजब प्रकार! सलमान चेंडू उचलायला वाकला अन्…; अनोख्या रनआउटनंतर पाकिस्तानची फजिती 

भारतातील इराणी राजदूत मोहम्मद फताली यांनी शुक्रवारी सांगितले की, इराण भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग प्रदान करेल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या सुरक्षित मार्गाबद्दल विचारले असता मोहम्मद फताली म्हणाले, "भारत आमचा मित्र आहे आणि आमचे हितसंबंध सामायिक आहेत. युद्धानंतर भारत सरकार विविध क्षेत्रात इराणला मदत करेल."

हेही वाचा – Shocking Incident : संतापजनक! झोमॅटोवरून मागवलेल्या बिर्याणीत 'कुत्र्याचा पाय'? व्हिडिओने सोशल मीडियावर उडवली खळबळ 

अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ले आणि त्यानंतर झालेल्या युद्धादरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने जगभरात तेल पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. शुक्रवारी, भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीबद्दल चिंता व्यक्त केली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version