परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. याबद्दल राऊत यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचा दावा केला जाधव यांनी केला.
त्यांची हत्या करण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचं जाधव यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. ही सुपारी परभरणीमधील एका मोठ्या व्यक्तीकडून देण्यात आली जाधव यांनी सांगितलं. जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे त्यानंतर प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.