Noida Couple’s Death Mystery : तो अखेरचा संदेश, बंद कारमध्ये दोघांचा मृतदेह, हातात पिस्तुल…; तरुणाच्या गूढ मृत्यूनं नोएडा हादरलं

नोएडा शहरात एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली.
Noida Couple’s Death Mystery : तो अखेरचा संदेश, बंद कारमध्ये दोघांचा मृतदेह, हातात पिस्तुल…; तरुणाच्या गूढ मृत्यूनं नोएडा हादरलं

नवी दिल्ली : नोएडा शहरात एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. या तरुणाने स्वतःला गोळी मारून जीवन संपवल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र मृत्युपूर्वी त्याने केलेल्या व्हॉट्स अँप मेसेजमुळे तरुणाच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. दरम्यान, त्या तरुणाच्या कुटुंबियांनी जातीयवाद आणि हमक्यांचा आरोप केल्याचे समोर आले आहे. घटनेपूर्वी, 32 वर्षीय सुमितने त्याच्या कुटुंबाला असा संदेश पाठवला होता की, "मी माझे जीवन संपवणार आहे आणि ती महिला माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. आमच्या 15 वर्षांच्या नात्यामध्ये तिने मला लग्नाचे आश्वासन दिले होते. पण आता ती दुसऱ्याशी लग्न करणार आहे. यामुळे, तिने माझी फसवणूक केल्यामुळे मी माझे जीवन संपवणार आहे." हा संदेश तपासात केंद्रस्थानी आला आहे. 14 फेब्रुवारी रोजी सेक्टर 107 जवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये दिल्लीतील त्रिलोकपुरी येथील रहिवासी सुमित आणि नोएडातील सेक्टर 101 येथील 26 वर्षीय रेखा यांचे मृतदेह गोळी लागलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी सांगितले की, गाडी आतून लॉक केलेली होती आणि सुमितच्या हातातून पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त यमुना प्रसाद यांनी सांगितले की, दादरी रोडजवळ एका कार पार्क केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा : Bhopal News: ‘जुदाई’ सिनेमा प्रत्यक्षात उतरला! प्रेयसीने दिले दीड कोटी; पत्नीने घटस्फोटासाठी मान्य केला सौदा

"तपासणी केली असता, गाडीत एक मुलगा आणि एक मुलगी आढळून आले. त्यांच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. मुलाच्या हातातून एक पिस्तूल सापडली असून गाडी आतून लॉक केलेली होती. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते," असे या प्रकरणी तपास करत असलेले पोलीस म्हणाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. ‘जातीयवादाचे बळी’, असा आरोप सुमीतच्या कुटुंबाने केला आहे. तथापि, सुमितच्या कुटुंबाने मृत्यूच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका चुलत भावाने आरोप केला आहे की या जोडप्याची हत्या झाली असावी आणि ते “जातीयवादाचे बळी” ठरले होते. “सुमित माझा धाकटा भाऊ आहे. तो आणि मुलगी 12-15 वर्षांपासून एकत्र होते आणि ती आमच्या कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित असायची. आमच्याकडून कधीही कोणताही दबाव आला नाही,” असे नातेवाईकाने सांगितले. रेखाच्या कुटुंबाने या नात्याला आक्षेप घेतल्याचा दावा त्यांनी केला कारण दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, जोडप्याला महिलेच्या नातेवाईकांकडून टोमणे मारले जात होते.

“आम्हाला वाटते की दोघांचीही हत्या झाली आहे आणि ते जातीयवादाचे बळी होते,” असा आरोप चुलत भावाने केला आहे. सालारपूरमधील महिलेच्या गावापासून काहीशा मीटर अंतरावर कार सापडलेल्या ठिकाणाचे वर्णन करताना ते “संशयास्पद” असल्याचे सांगितले. सुमितने रेखासाठी अलिकडेच एक फ्लॅट खरेदी केला होता. त्यांचे नाते दोन्ही कुटुंबांना वर्षानुवर्षे माहित होते, असा दावाही त्याने केला. सुमितच्या कुटुंबाने दिल्लीतील त्रिलोकपुरी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. तर रेखाच्या कुटुंबाने नोएडातील सेक्टर 58 पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की पोलिसांनी त्यांना लवकर शोधले असते तर "त्यांचे प्राण वाचले असते". सुमितच्या हातातून सापडलेले शस्त्र हे आत्महत्येच्या शक्यतेकडे निर्देश करत असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे असले तरी, त्यांनी कोणताही सिद्धांत नाकारलेला नाही. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version