पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन वाइन मागवणे चांगलेच महागात पडले आहे. ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकाला ८ लाख ९६ हजार ९४८ रुपयांना गंडा बसला असून या नागरिकाने पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
ऑनलाइन माध्यमातून औंधमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे. वाइन खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ओटीपीची मागणी करून ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ मे २०२१ ते १७ मे २०२१ या कालावधीमध्ये घडला. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राहत्या घराजवळील वाइन शॉप शोधण्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले. यावेळी त्यांना आनंद पार्कयेथील एका वाइन शॉपची माहिती मिळाली. त्यात नमूद केलल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधत घरपोच वाइन पाहिजे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करत व्यवहार पूर्ण करत त्यांच्या मोबाईलवर आलेया ओटीपी मागून घेतला. त्याद्वारे त्यांनी तक्रारदाराच्या क्रेडीट कार्डवरून ४८ हजार ११० रुपयांचा व्यवहार केला. मात्र, त्यांना घरपोच वाइन न आल्यामुळे त्यांनी पुन्हा त्या क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी त्या व्यक्तीने त्यंच्या बॅंक खात्याची माहिती घेतली. त्या खात्यातून त्यांनी पुन्हा ८ लाक ४८ हजार ८३८ रुपये काढून घेतले. अशा पद्धतीने त्यांची फसवणूक झाली असून त्यांच्याकडून ८ लाख ९६ हजार ९४८ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.