रश्मिकाला पडली विकीची भुरळ!

रश्मिकाला पडली विकीची भुरळ!

मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : आजकाल चित्रपटांपेक्षा सिनेसृष्टीतील कलाकार हे त्यांच्या समाज माध्यमांवरील व्हिडिओसमुळे अधिक चर्चेत असतात. दरम्यान अलीकडच्या काळात विकी कौशलचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर बराच व्हायरल झाला. या व्हिडिओतील विकीच्या डान्सची बरीच चर्चा रंगली.

अभिनेता विकी कौशलची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच जणांनी त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. अशातच आता अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला देखील विकी कौशलच्या या डान्स ची भुरळ पडलीये. नुकतीच रश्मिका देखील विकी कौशलच्या या डान्सचे अनुकरण करताना दिसली. तिने अलीकडेच एक व्हिडिओ समाज माध्यमांवर सामायिक केला यात ती विकी कौशल सारखा डान्स करताना दिसली. त्यामुळे रश्मिकाच्या या व्हिडिओची सध्या भरपूर चर्चा आहे.


आपल्या व्हिडिओत रश्मिकाने विकीच्या डान्सचे हूबेहूब अनुकरण केले आहे. तिचा डान्स पाहून चाहते खुश झाले आहेत. या व्हिडिओत तिने विकीलाही टॅग केले आहे.या गाण्यावर डान्स करताना ती खूप खुश होती. पांढऱ्या रंगाचा कुर्ता तीने परिधान केला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version