Rajasthan Crime : संतापजनक! सात वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून अत्याचार; वेदनेने विव्हळत मुलीने पालकांना सांगितला घडलेला प्रसंग

Rajasthan Crime : संतापजनक! सात वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून अत्याचार; वेदनेने विव्हळत मुलीने पालकांना सांगितला घडलेला प्रसंग

राजस्थान : राजस्थानमधील बाडमेर शहरात रविवारी संध्याकाळी एका 7 वर्षांच्या मुलीवर तिच्याच शेजाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपीने घर दाखवण्याचे आमिष दाखवून तिला सोबत नेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेर शहरातील एका भागात ही घटना घडली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच आरोपीला ताब्यात घेतले. ती अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असताना आरोपी तरुणाने एका अनोळखी व्यक्तीचे नाव घेऊन तिला त्याचे घर दाखवण्यास सांगितले. तो तिला सोबत घेऊन गेला आणि एका निर्जन ठिकाणी नेऊन झुडपांमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा : Niphad News : धक्कादायक! अंगणवाडी पोषण आहाराच्या पाकिटात मृत पक्षी; संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाईची लाभार्थ्यांची मागणी

वेदनांनी रडत-रडत ती मुलगी घरी पोहोचली. तिने आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले. पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मुलीच्या घरीही भेट दिली. पोलिसांनी तेज सिंग यांचा मुलगा माघ सिंग या संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी आरोपीविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. तर आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version