छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून एका डिलिव्हरी बॉयने पीएचडी करणाऱ्या 31 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला. ही घटना 12 जुलै रोजी रात्री घाटी परिसरातील क्वार्टरमध्ये घडली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी दीपक मधुकर भुक्तार (35, रा. घाटी क्वार्टर, ह.मु. पडेगाव) याला अटक केली आहे.
संशोधन करणाऱ्या तरुणीची 2 महिन्यांपूर्वी आरोपी दीपक याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. आरोपी घाटीतील क्वार्टर्समध्ये राहायचा. त्याला खोली रिकामी करण्यास सांगितले. त्यामुळे त्याने 8 जुलै रोजी सायंकाळी सामान पॅक करण्यासाठी पीडितेला बोलावले. रात्री उशीर झाल्याने ती तिथेच थांबली. रात्री दीपकने तिच्याशी चांगले वर्तन केले. त्यानंतर त्याने 12 जुलै रोजी उर्वरित सामान पॅक करण्यासाठी बोलवले आणि रात्री तिच्यावर 2 वेळा अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी, 13 जुलै रोजी सकाळी 7 वाजता त्याने तिला बळजबरीने एक गोळी खाऊ घातली. नंतर समतानगर येथील खोलीवर नेऊन सोडले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.