Psycho Killer Poonam: ‘तिने लग्नाआधी मुलांना मारलं…’ सायको किलर पूनमच्या आईने केले थक्क करणारे खुलासे

तिच्या स्वभावातील बदलांमागील कारणांवर अजूनही गूढ कायम आहे. पोलिस तपासात या मालिकेतील हत्यांचा हेतू शोधला जात आहे.
Psycho Killer Poonam:  ‘तिने लग्नाआधी मुलांना मारलं…’ सायको किलर पूनमच्या आईने केले थक्क करणारे खुलासे

हरियाणातील पानीपत येथे उघडकीस आलेल्या मालिकेतील हत्यांनी संपूर्ण देशाला हादरवले आहे. निष्पाप मुलांचे प्राण घेणारी पूनम नावाची महिला आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या दोन वर्षांत तिने चार बालकांचा जीव घेतल्याचा आरोप असून त्यामध्ये तिच्या स्वतःच्या मुलाचाही समावेश आहे. 1 डिसेंबर रोजी झालेला चौथा खून तिच्यासाठी शेवटचा ठरला. घटनास्थळीच ती अडकल्याने तिच्या भयानक कृत्यांचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे पानीपतच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

या मालिकेतील हत्यांच्या तपासात आता एक नवे पान उघडले आहे. प्रथमच पूनमची आई पुढे आली असून तिने मुलीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. तिच्या मते, लग्नापूर्वी पूनमचा स्वभाव अतिशय शांत आणि साधा होता. घरात किंवा नातेवाईकांमध्ये कधीच तिची तक्रार समोर आली नव्हती. मुलांवर प्रेम करणारी आणि कुटुंबाशी एकनिष्ठ असलेली पूनम अचानक अशा अत्यंत टोकाच्या गुन्ह्याकडे कशी वळली, हे तिच्या आईलाही कोडंच ठरत आहे. पूनममध्ये मानसिक असंतुलनासारखी कोणतीच लक्षणे लग्नाआधी कधीही दिसली नाहीत, असे तिचे म्हणणे आहे. “जर काही त्रास किंवा विकार जाणवला असता, तर आम्ही लगेच उपचार केले असते. पण लग्नाआधी तिचे वागणे पूर्णपणे सामान्य होते,” असे सुनीता यांनी सांगितले.

हेही वाचा: Toll Booth Collection: आता टोलवर थांबण्याची गरज संपणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा निर्णय

त्या पुढे म्हणाल्या, “जर ती खरंच अशी होती, तर लग्नाआधीच्या काळात तिने कोणत्याही मुलाला मारले का नाही?” पूनमची आई यावर ठाम आहेत की मुलीच्या आयुष्यातील बदल लग्नानंतरच सुरू झाले. त्या म्हणतात, “हे बदल कधी आणि कसे झाले हे आम्हालाही समजत नाही. माझी मुलगी इतक्या विकृत प्रवृत्तीची असेल, तर तिने आधीच असे प्रकार केले असते ना.” त्यांच्या बोलण्यात निराशा, वेदना आणि अविश्वास स्पष्टपणे जाणवत होता. तथापि त्या इतकं मात्र स्पष्टपणे म्हणाल्या की, “जर माझ्या मुलीने हे गुन्हे केले असतील, तर तिची सुटका होणार नाही. तिने चुकीचं केलं आहे, तर तिला शिक्षा मिळायलाच हवी. तिच्या चुकीचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही.” पण त्यांच्या मनातला एक प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे, एका आईने हे भयावह पाऊल का उचललं?

पूनमच्या हत्यांच्या मालिकेमागील कारणं अजूनही अधांतरी आहेत. मत्सर, मानसिक ताण, की काही अदृश्य तणाव पोलिस तपास यापैकी कोणता धागा पकडणार हे पुढील चौकशीत स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागातील शांत स्वभावतून अचानक सायको किलर बनलेली पूनम या गुन्ह्यांच्या इतिहासात एक रहस्यमय अध्याय बनत चालली आहे. पोलिस या प्रकरणातील सर्व पैलू तपासत असून अनेक माहिती हळूहळू समोर येत आहेत. पण या थरारक हत्याकांडामागील खरा हेतू काय, याची उत्तरं अद्यापही गूढ आहेत. पानीपत हादरले आहे, आणि देशभरात एकच प्रश्न घुमू लागला आहे, मुलांची काळजी घेणारी एक आई एका क्षणात राक्षसी रूप कसं धारण करते?

हेही वाचा: Putin Visit in India:भारत दौऱ्यात पुतिन यांचे ठाम विधान; अमेरिकेच्या टॅरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर रणनीतिक चर्चा

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version