उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या राज्यांमध्ये जनतेचा भाजपवर असलेला विश्वास आणि भाजपचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपुरात आले आहेत. यावेळी, गोव्याच्या यशासाठी नितीन गडकरी यांनी फडणवीसांचे अभिनंदन करत त्यांचा सत्कार केला.
नितीन गडकरी म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये जातपात विसरून मतदान पार पडले. तर विकासावर मत मिळते हे सिद्ध झाले आहे. तसेच नागपुरातही भाजपाने विकास केला असून महाराष्ट्रातही भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केल आहे.
गडकरी म्हणाले, गोव्यात जनतेने भाजपला पूर्ण बहुमत दिले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच गोव्यात देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षाचे काय स्थान आहे हे निवडणुकीने दाखवून दिले असल्याचेही ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.