भारतात ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण

भारतात ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण

भारतात कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. भारतात आता ओमायक्रॉन विषाणूचा तिसरा रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील जामनगर येथे ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेला रुग्ण सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतला होता. यावेळी त्याची कोविड चाचणी करण्यात आली. या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल आहे. दरम्यान, भारतातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांचा आकडा हळहळू वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

आज ओमायक्रॉन विषाणूचा तिसरा रुग्ण गुजरातमध्ये सापडला आहे. याआधी कर्नाटकमध्ये आमिओक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आमिओक्रॉनच्या दोन रुग्णांमधील एका रुग्णाचे वय ६६ आहे तर एक रुग्णाचे वय ४६ असून आमिओक्रॉन रुग्णाच्या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version