मलिकांच्या समर्थनात नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

मलिकांच्या समर्थनात नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी  महाविकास आघाडीकडून मलिकांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला.

नवाब मलिक यांच्या समर्थनात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. ‘एक नवाब सौ जवाब’ अशा घोषणा करत मलिकांवर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला.  यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मविआच्या आंदोलनात अनेक बडे नेते सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी नवाब मलिकांच्या पाठी उभी असल्याचे चित्र दिसत आहे.

दुसरीकडे, मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधक आंदोलन करत आहेत. राज्यात नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, पुणे जिल्ह्यात भाजपने आंदोलन केले आहे. यावेळी मविआने नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. पुण्यात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. नवाब मलिकांनी राजीनामा द्या, अशी मागणी भाजपने केली आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी आंदोलनात देण्यात आल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version