नवाब मलिकांचा जामीन रद्द करा, ईडीची मागणी

नवाब मलिकांचा जामीन रद्द करा, अशी मागणी करण्यासाठी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
नवाब मलिकांचा जामीन रद्द करा, ईडीची मागणी

मुंबई : नवाब मलिकांचा जामीन रद्द करा, अशी मागणी करण्यासाठी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आजारी आहे, उपचार करुन घ्यायचे आहेत; अशी कारणे देत नवाब मलिक यांनी जामीन घेतला आहे. पण सध्या ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत आणि प्रचार करण्यात गुंतले आहेत. याचा अर्थ नवाब मलिक यांची तब्येत स्थिर आहे. यामुळे वैद्यकीय कारणासाठी दिलेला जामीन रद्द करुन नवाब मलिकांची पुन्हा कोठडीत रवानगी करण्याची मागणी ईडीने केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version