Nagpur Crime: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर श्रीमंती दाखवणं पडलं महाग! मित्रानेच घरावर टाकला दरोडा; लाखोंची चोरी करून मागितली 40 लाखांची खंडणी

व्हॉट्सअॅप स्टेटसवर AI च्या मदतीने श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या नागपूरातील तरुणाच्या घरावर त्याच्याच परिचित मित्राने दरोडा टाकल्याचा आरोप आहे.
Nagpur Crime: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर श्रीमंती दाखवणं पडलं महाग! मित्रानेच घरावर टाकला दरोडा; लाखोंची चोरी करून मागितली 40 लाखांची खंडणी

नागपुरात सोशल मीडियावर श्रीमंतीचे प्रदर्शन करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने स्वतःकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याचे दर्शवणारे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर त्याच्याच परिचित मित्राने दरोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक स्थितीचे प्रदर्शन किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर याचलवार यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर एआयच्या मदतीने तयार केलेले काही व्हिडिओ पोस्ट केले होते. या व्हिडिओंमध्ये त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचा आभास निर्माण होत होता. हे स्टेटस पाहिल्यानंतर त्यांच्या परिचित असलेल्या एका व्यक्तीने घरावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून सुमारे साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅप कॉलच्या माध्यमातून समीर याचलवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच चोरी केलेल्या ऐवजाव्यतिरिक्त तब्बल ४० लाख रुपयांची खंडणीही मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांनी वापरलेल्या कारचा क्रमांक आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. या तपासानंतर दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. आर्थिक स्थिती, मौल्यवान वस्तू किंवा घरातील माहिती सार्वजनिकरित्या शेअर केल्यास त्याचा गैरफायदा गुन्हेगारांकडून घेतला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर वैयक्तिक आणि आर्थिक माहितीचे प्रदर्शन टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या धमक्या किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version