‘माझे आजोबा आणि प्रकाश यांचे आजोबा एकत्र होते’

‘माझे आजोबा आणि प्रकाश यांचे आजोबा एकत्र होते’

शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी २३ जानेवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त या युतीची घोषणा करण्यात आली. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखाताई ठाकूर, अबुल खान उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले ‘आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिवस आहे. ‘माझे आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे सहकारी एकमेकांचे स्नेही होते. दोघांनी त्यावेळेला समाजातील वाईट रुढी पंरपरा यावर प्रहार केले आघात केले. आता राजकारण ज्या वाईट चाली, पंरपरा चालल्या आहेत त्याच्यावर आघात करून त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि त्यांच्यासोबतचे आमच्या आजोबांनी-वडिलांनी दिलेले जीवाला-जीव देणारे जे काही सहकारी आहेत ते एकत्र येऊन.. देश प्रथम. हा शब्द महत्त्वाचा आहे.’

‘आम्हाला जेव्हा वाटलं फसवणुकीचा राजकारण होतंय तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत गेलो आणि मविआ सरकार यशस्वीपणे चालवलं. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली, तुम्हाला सोबत घ्यायला कोणाची ना नाही. आमचं असं ठरलं की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपल्या मित्रपक्षाला आणायचं आणि मित्रपक्षांसोबत हित सांभाळायचं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘महाराष्ट्रातील तळागळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. निवडणूक आल्या की, गरीबांचा उदोउदो करायचा.. गरीबांनी मतदान केल्यानंतर यांची उड्डाणं चालू. हे आता थांबविण्याची गरज आहे. म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत.’अजून कोणी कुठल्या जागा लढवायच्या ही वेळ आलेली नाही, वेळ आल्यावर जागा लढवायचा निर्णय होईल, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतील जागा वाटपाच्या प्रश्नावर दिलं. तसंच हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या, असं आव्हान त्यांनी दिलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version