Muharram Rat Poision Capsule Case Update: मोहरमच्या मिरवणूकीत लोकांना उंदीर मारण्याच्या गोळ्या का वाटल्या? फैय्याजने दिलेल्या उत्तराने पोलिसही चक्रावले

प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे होत असून या घटनेचा तपास अधिक गतीने सुरू आहे.
Muharram Rat Poision Capsule Case Update: मोहरमच्या मिरवणूकीत लोकांना उंदीर मारण्याच्या गोळ्या का वाटल्या? फैय्याजने दिलेल्या उत्तराने पोलिसही चक्रावले

मुंबईत मोहरमच्या दिवशी विषारी झिंक फॉस्फाईडच्या गोळ्या वाटल्याच्या प्रकरणात आरोपी फय्याज प्रेमजीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे होत असून या घटनेचा तपास अधिक गतीने सुरू आहे.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, फय्याज प्रेमजीला त्याच्या पत्नीने सोडले होते. त्यानंतर त्याने अनेक लोकांना आपले शत्रू मानल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या मनात सर्वांकडून सूड घेण्याची भावना होती, आणि “सर्वांनी मिळून माझ्यावर अन्याय केला” अशी त्याची मानसिकता असल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे.

हेही वाचा – Nasarapur Crime Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज फैसला! चिमुरडीला न्याय मिळणार, भीमरावला काय शिक्षा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष 

या प्रकरणात आरोपीचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. झिंक फॉस्फाईड त्याने कुठून मागवले आणि ते त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, याचा सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा – Ketan Agarwal Case : केतन हत्या प्रकरणात तपासाला नवे वळण! सिया-चेतनविरोधात आणखी एक महत्त्वाचा पुरावा जप्त; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार 

त्याचप्रमाणे, 39 वर्षीय फय्याज प्रेमजी हा BBA पदवीधर असून त्याच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते का किंवा त्याची वैद्यकीय पार्श्वभूमी काय आहे, याचीही पोलीस चौकशी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आरोपी वैयक्तिक आयुष्यात अत्यंत निराश आणि मानसिक तणावाखाली होता, असेही तपासात समोर आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version