मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार २५ जूनपासून २७ जूनपर्यंतच्या काळात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरनध्ये २५ ते २८ जूनपर्यंतच्या काळात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.