बळजबरीने बीअर पाजून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार!

बळजबरीने बीअर पाजून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार!

बळजबरीने बीअर पाजून 18 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना नागपूरच्या बेलतरोडी भागात उघडकीस आली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी दोघांविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. असून निखिल सोमकुवर व त्याचा मित्र वतन गोमकाळे यांना पोलिसांनी अटक केली …

पीडित विद्यार्थिनी B.A. प्रथम वर्षाला शिकते.

ही विद्यार्थिनी आई आणि आजोबांसोबत राहते.

निखिल हा पीडित विद्यार्थिनीच्या मामाचा मित्र आहे.

काही दिवसांपूर्वी तो विद्यार्थिनीच्या घरी आला होता.

त्यामुळे विद्यार्थिनी त्याला ओळखत होती.

त्यानंतर 15 जुलैला निखिल हा विद्यार्थिनीच्या घरी आला.

त्याने तिच्यावर अत्याचार केला.

19 जुलैला पुन्हा निखिल पुन्हा विद्यार्थिनीच्या घरी आला.

यावेळी तो आपल्यासोबत वतन याला घेऊन आला.

निखिलने यावेळी बीअरच्या तीन बाटल्याही आणल्या होत्या.

दोघांनी विद्यार्थिनीला बळजबरीने बीअर पाजली.

आधी निखिल आणि नंतर वतनने विद्यार्थिनीवर अत्याचार केला.

याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

त्या घटनेमुळे पीडित विद्यार्थिनी तणावाखाली होती.

आईने विचारणा केली. तेव्हा निखिल आणि वतनने आपल्यावर अत्याचार केल्याचं तिने आईला सांगितलं.  विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version