शुभम उमाळे, प्रतिनिधी
पहलगाम : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याला आज, 22 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत. देशभरातून तसेच विदेशी पर्यटकांनी पहलगाम येथे आलेल्या नागरिकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून केवळ हिंदू पुरुषांना टार्गेट केले. त्यामुळे हा धर्मवाद असल्याचे दिसून आले. या हल्ल्याने देशचं नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले होते. या हल्ल्यांचा संपूर्ण जगभरातून तीव्र निषेध व्यक्त होत होता. दरम्यान, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांच्या स्मरणार्थ येथे स्मारक उभारण्यात आले आहे. या पर्यटकांनी नावे या स्मारकावर लिहिण्यात आली असून हे स्मारक त्या भ्याड हल्ल्याची आठवण येथे येणाऱ्या नागरिकांना करून देते. येथील परिसराचा आढावा जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे रिपोर्टर शुभम उमाळे यांनी घेतला आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या 26 पर्यटकांच्या यामध्ये महाराष्ट्र, विशेषतः डोंबिवलीतील 3 जण होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लिडर नदीच्या काठावर ‘बैसरन व्हॅली’ मध्ये काळ्या संगमरवरी दगडाचे स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक हल्ल्याची भीषण आठवण आणि बळी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून उभे करण्यात आले आहे.
स्मारकाची मुख्य वैशिष्ट्ये –
स्थान : पहलगाम (काश्मीर) येथील बैसरन व्हॅली/लिडर नदीचा काठ.
उद्देश : 26 बळी पडलेल्या पर्यटकांच्या बलिदानाची स्मृती.
निर्मिती : जम्मू आणि काश्मीर सरकारद्वारे, हल्ल्याच्या पहिल्या वर्धापन दिनापूर्वी.
महाराष्ट्राचा संबंध : या हल्ल्यात महाराष्ट्रातील (डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने) पर्यटकांचाही मृत्यू झाला होता. ज्यांच्यासाठी डोंबिवलीतही स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी होती.
इतर महत्त्वाचे मुद्दे : हल्ल्यानंतर पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता, परंतु हे स्मारक आता पर्यटकांना आदरांजली वाहण्याचे केंद्र बनले आहे. स्थानिक काश्मिरी रहिवाशांनी या हल्ल्याचा निषेध करत पीडितांसाठी मेणबत्ती मार्च काढला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.